A STUDY OF THE PLACE, STATUS AND NEEDS OF MODERN AGRICULTURE IN MAHARASHTRA
DOI:
https://doi.org/10.65009/xc6nvk52Abstract
महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख कृषीप्रधान राज्य असून, भौगोलिक विविधतेमुळे येथे कोकणातील आर्द्र हवामानापासून ते विदर्भ आणि मराठवाड्यातील कोरडवाहू प्रदेशांपर्यंत विविध हवामान प्रकार आढळतात. या विविधतेमुळे भात, ऊस, कापूस, सोयाबीन, द्राक्षे, डाळी आणि भाजीपाला यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तथापि, दीर्घकाळ पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून राहिल्यामुळे उत्पादनक्षमतेत मर्यादा, नैसर्गिक संसाधनांचा अपुरा वापर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अस्थिरता दिसून येते. अशा परिस्थितीत आधुनिक शेती ही कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. आधुनिक शेतीमध्ये सुधारित बियाणे, ठिबक व तुषार सिंचन, यंत्रीकरण, हरितगृह शेती, डिजिटल कृषी व्यवस्थापन (मोबाईल अॅप्स, सेन्सर तंत्रज्ञान), तसेच जैविक आणि सेंद्रिय नवकल्पना यांचा समावेश होतो. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढ, खर्चात बचत, जलसंधारण आणि पर्यावरणीय टिकाव साध्य होतो. या संशोधनात महाराष्ट्रातील आधुनिक शेतीचे स्थान, तिचा दर्जा आणि भविष्यातील गरज यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासातून असे आढळून येते की, आधुनिक शेतीचा स्वीकार काही प्रगत जिल्ह्यांमध्ये (उदा. पुणे, नाशिक, सांगली) अधिक प्रमाणात झाला आहे, तर दुष्काळग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागांमध्ये त्याचा प्रसार मर्यादित आहे. यामुळे कृषी विकासात प्रादेशिक असमतोल निर्माण झाला आहे.
,

